नवी दिल्ली – वायव्य दिल्लीतील केशव पुरममधील एक जुनी तीन मजली इमारत रविवारी दुपारी कोसळली, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
इमारत कोसळल्याच्या घटनेची माहिती दुपारी 2.19 वाजता मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या, असे दिल्ली फायर सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारत उतरवली जात असतानाच ही इमारत कोसळली, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.