मुंबई- कलर्स मराठीवरील आगळी वेगळी मालिका शूभमंगल ऑनलाईन सध्या महत्वाच्या टप्यावर आहे. शर्वरी आणि शंतनुच्या विवाहासाठी मान्यता मिळाली आणि घरात विवाहसोहळ्याची लगबग सुरु झाली. मात्र नेहमी प्रमाणेच सगळे लग्नातही ऑनलाईन उपस्थिती लावणार आहे.
आता रंगणार आहे टेलिव्हीजनवरील पहिला ऑनलाईन लग्नसोहळा. लॉकडाउन दरम्यानचा ऑनलाईन लग्नसोहळा ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेमध्ये २१ नोव्हेंबर रात्री १०.०० वा आपल्या कलर्स मराठीवर पार पडणार आहे. शंतनू आणि शर्वरीचा हा ऑनलाईन लग्न सोहळा कसा पार पडेल ? काय गंमती जमती होतील ? हे बघण्यासाठी आगळया वेगळ्या लग्नसोहळयामध्ये आपल्यालाही उपस्थित राहवं लागेल.
मालिकेतील सगळ्या अडथळ्यांवर मात करत विवाहासाठी उभे राहणार आहे. मालिकेच्या नावाप्रमाणे सगळे विधी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या विवाहासाठी मालिकेतील सगळ्यांमध्येच उत्सुकता दिसते आहे.