मुंबई- नात्यांची मेजवानी असलेल्या मालिकेतून अभिनेता भरत जाधव कमबॅक करणार आहे. याच मालिकेच्या निमित्ताने त्याने आईचा फोटो शेअर केला आहे. आईच्या आठवणीत भावून झाला आहे.
मातीच्या घड्याला घडवताना एका हाताने आतून आधार द्यावा लागतो तर दुसऱ्या हाताने बाहेरून थोपटाव लागत. माणसाचंही तसचं असत. मला आतून आधार देणार हात आईचा होता आणि बाहेरून थोपटणारा हात बाबांचा.आज आई जवळ नसली तरी तिच बोलणं, तिचं हसणं, वेळेवर जेवलास का म्हणून सतत काळजी करणं सगळ खूप आठवतं, असं त्याने फोटोला कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, भरत जाधव नव्या भूमिकेतून अनेक वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स मराठीवरील सुखी माणसाता सदरा या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर ही नात्यांची मेजवानी आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे.