फुकटची सत्ता मिळाली, डोक्‍यात जाऊ देऊ नका

राजगुरूनगर : चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला टोला

राजगुरूनगर (पुणे) – राष्ट्रवादी हा झोपेत चालणारा पक्ष आहे. त्यांना झोपेमध्ये स्वप्न पडतात. फुकटची मिळालेली सत्ता आहे, ती डोक्‍यात जाऊ देऊ नका, तुमचे उर्मट बोलणे आम्ही सहन करणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला.

राजगुरूनगर चंद्रकांत पाटील आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांनी भाजप हवेवर चालणारा पक्ष आहे, अशी टीका गुरुवारी (दि. 19) भाजपवर केली होती. त्याला चंद्रकांत पाटील यांनी राजगुरूनगर येथे प्रत्युत्तर दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र आणि देशाच्या संस्कृतीमध्ये मुंगी बनून साखर खावी लागते. रोज असे उर्मटपणे बोललेले कोणीही सहन करणार नाही. नवाब मालिकांचे हे म्हणणे आहे का वाढीव बिले ग्राहकांनी भरावीत का? प्रत्येक वेळी आधीच्या सरकारने काय केले, केंद्राने काय केले एवढाच सुर आवळला आहे. मात्र, तुम्ही काय करत आहात? “नाचता येईना अंगण वाकडे’, अशी तुमची अवस्था झाली आहे. वीज बिलांच्या बाबत अभ्यास का करत नाही, असा सवला ही त्यांनी उपस्थित केला.

नितीन राऊतांचा प्रस्ताव अजित पवारांनी फेटाळला.. 

कल्याणकारी राज्यामध्ये लोकांच्या फायद्यासाठी निर्णय घ्यावे लागतात, वेळप्रसंगी कर्ज काढून सेवा द्यायच्या असतात. सरकार चालविण्यासाठी विविध उत्पन्नाचे मार्ग आहेत. यावर तोडगा म्हणून वीज वितरणला सरकारने पैसे दिले पाहिजेत. वीज बिले कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला पाहिजे. जसा एसटीला पैसे देता त्या धर्तीवर वीज कंपन्यांना सरकाने पैसे दिले पाहिजेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला तो अजित पवार यांनी फेटाळला थोडक्‍या ऊर्जा खात्याने प्रस्ताव दिला वित्त खात्याने तो फेटाळला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.