बारामती-सानुग्रह अनुदान नाकारल्याने बारामती नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी नगरपरिषद विरोधात घोषणाबाजी करत नगर परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे. कोण म्हणत देत नाही घेतल्याशिवाय राहात नाही अशा निषेधार्थ घोषणा देत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
पंचवीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यास नगराध्यक्षांनी यापूर्वी मान्यता दिली होती असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र दिवाळी सुरू झाली तरीदेखील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले गेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे.