शाब्बास! दिव्यांग विद्यार्थ्यांचा 92.60 टक्के निकाल

पुणे – बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 92.60 टक्के एवढा लागला आहे. यात मुलांचा निकाल 92.08 टक्के तर मुलींचा निकाल 93.69 टक्के लागला आहे.

अंध, अपंगासह विविध प्रकारांचा दिव्यांगामध्ये समावेश केला जातो. दिव्यांगाचे प्रमाणही असमान स्वरुपाचे असते. या दिव्यांगातील एकूण 5 हजार 777 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यात मुलांची संख्या 3 हजार 905 तर मुलींची संख्या 1 हजार 872 एवढी होती. एकूण 5 हजार 773 विद्यार्थीच परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यात 3 हजार 902 मुले व 1 हजार 871 मुली होत्या.

परीक्षेत एकूण 5 हजार 346 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांची संख्या 3 हजार 593 तर मुलींची संख्या 1 हजार 753 एवढी आहे.

आयपॅडद्वारे परीक्षा दिलेल्या निशकाला 73 टक्के गुण
राज्याच्या मुंबई विभागीय मंडळातील मुंबई येथील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयातील निशका नरेश हसनगडी या राज्यातील एकमेव विद्यार्थ्यांनीला परीक्षेसाठी आयपॅड वापरण्यास खास परवानगी राज्य मंडळाकडून देण्यात आली होती. ही दिव्यांग विद्यार्थीनी अध्ययन अक्षम असल्याबाबत डॉक्‍टरांचे प्रमाणपत्रही मंडळाकडे सादर करण्यात आले होते. तिने परीक्षेची तयारी आयपॅडवरच केली होती. त्यामुळे तिला आयपॅड वापरण्यास परवानगी देण्यात आली होती. या विद्यार्थीनीला परीक्षेत 73 टक्के गुण मिळाले आहेत. हे गुण कौतुकास्पदच आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.