लंडन- शिक्षणाला जसं वयाचं बंधन नसतं, तसंच शिक्षण देणाऱ्या शिक्षकालाही वयाचं बंधन नसतं. प्रत्येक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. असाच एका शिक्षकाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे घरूनच ऑनलाईन क्लासेज सुरू आहेत. अशात अनेक शिक्षक-प्राध्यापक फोन, कॉम्प्युटरच्या मदतीने घरूनच क्लासेस घेत आहेत. त्यात नवीव तंत्र शिकून घेण्याची ईच्छाशक्ती दिसून येत आहे.
जुलिया क्रोह्न मेकलिंग नावाच्या युजरने हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत युजरने लिहिले की, माझे वडील यूनिव्हर्सिटी ऑफ सेंट थॉमसमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. ते मागील 50 वर्षांपासून तेथे शिकवत आहेत.
ते आता 91 वर्षांचे असून, एखाद्या बॉसप्रमाणे व्हर्चुएल टिचिंग घेतात. ते दशकांपासून शिकवत आहेत, मात्र आजही त्यांच्यात तसाच उत्साह आहे जसा पहिल्यांदा होता. मुलांना माहित नाही ते किती नशीबवान आहेत. या पोस्टला 28 हजारांपेक्षा अधिक वेळा शेअर करण्यात आले आहे. तर 10 हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक्स केले आहे.