सातारा – जिल्ह्यात संपी स्किनमुळे बुधवारी 9 जनावरांचा मृत्यू झाला असून आजअखेर 196 गायी व 60 बैल असे 256 पशुधन मृत झाले आहे. महाबळेश्वर वगळता 10 तालुक्यातील 144 गावांमध्ये आजअखेर 3481 गाय व 443 बैल अशा 3924 जनावरांस लपी स्किनचा प्रादुर्भाव झाला आहे.
आजअखेर 1296 गाय व 88 बैल अशी 1384 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यात गोवर्गीय पशुधनाची संख्या 3 लाख 52 हजार 436 असून आजअखेर बाधित गाव व बाधित गावाचे 5 किलोमीटर परिघातील एकूण 782 गावांमधील 1 लाख 96 हजार 186 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील 1 लाख 50 हजार 914 अशा 3 लाख 47 हजार 100 पशुधनाचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.