तिळाच्या तेलाचे गुणकारी फायदे 

तिळामध्ये मिनरल्स, ओमेगा फॅटी अ‍ॅसिड अशी अनेक आरोग्यवर्धक पोषणद्रव्य आढळतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात तीळाचा गोडाच्या पदर्थांसोबत नियमित जेवणातही वापर करतात. पण आहारात तीळाच्या बीया जितक्या फायदेशीर आहेत तितकेच तीळाच्या तेलामध्ये सौंदर्यवर्धक फायदेदेखील आहेत. म्हणूनच तुमच्या ब्युटी किटमध्ये तीळाच्या तेलाचा समावेश या ‘9’ कारणांसाठी अवश्य करा.

हृद्याचे आरोग्य सुधारते  
तीळाच्या तेलामध्ये लिनोलेइक अ‍ॅसिड हे ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड आढळते. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रेरॉल कमी होते आणि आवश्यक कोलेस्ट्रेरॉल वाढते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम,सेलेनियम आणि कॅल्शियम आढळते. यामुळे हृद्याचे स्नायू बळकट होतात.

हाडांचे आरोग्य सुधारते 
लहान मुलांना तीळाच्या तेलाने मसाज करावा असे आयुर्वेद सांगते. तीळाच्या तेलाने हाडं मजबूत होतात तसेच बाळाची वाढ सुधारते. नियमित तीळाच्या तेलाने मसाज केल्याने हाडांचे आरोग्य सुधारते. वाढत्या वयानुसार ते ढिसूळ होण्याचे प्रमाणही कमी होते. त्यामुळे  ऑस्ट्रोपोरायसिसचा धोकाही कमी होतो.

गरोदर स्त्रियांसाठी फायदेशीर  
गर्भवती स्त्रियांनी आहारात तीळाच्या तेलाचा समावेश करावा. यामधील फोलिक अ‍ॅसिड गर्भाच्या सुदृढ वाढीसाठी मदत करते. यामुळे डीएनए चे सिंथेसाईज तसेच बाळाची वाढ योग्यरित्या होते.

त्वचा मॉईश्चराईज करतात 
नैसर्गिकरित्या त्वचेला पोषण आणि मुलायमता देण्यासाठी तीळाचे तेल फायदेशीर ठरते. त्वचेमध्ये तेल खोलवर झिरपते त्यामुळे इतर तेलाच्या तुलनेत तीळाचे तेल अधिक फायदेशीर ठरते. म्हणूनच गरोदरपणाच्या काळात स्ट्रेचमार्क कमी करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनी तीळाच्या तेलाचा मसाज करावा.

 तोंडाचे आरोग्य सुधारते  
दातांमधील प्लाग काढण्यासाठी तीळाच्या तेल फायदेशीर ठरते. यामुळे दात नैसर्गिकरित्या शुभ्र होतात. तसेच बॅक्टेरियाचा नाश झाल्याने टुथ इनॅमलचेही संरक्षण होते.

शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते 
शरीरात पित्ताचा त्रास वाढला असल्यास, आठवड्यातून किमान दोनदा तीळाच्या तेलाने मसाज करा. पित्तामुळे शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते. मात्र तीळाच्या तेलाचा अतिवापर करू नका.

रक्तदाब नियंत्रणात ठेवतो  
तीळामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावरही नियंत्रण राहते. राईस ब्रान आणि तीळाचे तेल हे रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरते असे काही संशोधनातून समोर आले आहे.

व्हर्जायनल ड्रायनेस कमी होतो 
योनीमार्गातील शुष्कता कमी करण्यासाठी आहारात तीळाचे तेल अवश्य वापरावे. तीळाचे तेल नॅचरल ल्युब्ररीकंट असल्याने  व्हर्जायनल ड्रायनेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

ताण कमी होतो 
तेलाचा मसाज केल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते. डोकं आणि शरीर तेलाने मसाज केल्यास फायदेशीर ठरते. तीळाचे तेल कोमट गरम करून शरीराला मसाज करावा. त्यानंतर तासाभराने गरम पाण्याने आंघोळ करावी. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया  सुधारते आणि ताण कमी होतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)