पुणे – लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतरच्या दिवसापासून शहरात करोना बाधितांचा आलेख वाढताच आहे. दररोज बाधित संख्या 800 चा आकडा पार करीत आहे. आजही 861 नवीन बाधित सापडले आहेत. बाधितांची एकूण संख्या 22 हजार 381 वर जाऊन पोहोचली आहे.
बाधित वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हानही वाढत आहे. दुसरीकडे दिवसभरात 630 बाधित ठणठणीत बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज, दिवसभरात करोनामुळे 15 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. मागील दोन दिवसांतील साधारण तीन ते साडेतीन हजार नमुने अहवालातून ही बाधित संख्या समोर आली आहे. सोमवारी (दि.6) शहरात 4 हजार 284 स्वॅब घेण्यात आले.
सद्यस्थितीत शहरातील नायडू, ससून आणि खासगी रुग्णालयांत मिळून 7 हजार 912 बाधितांवार उपचार सुरू आहेत. त्यातील 368 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.