सप्टेंबर महिन्यात नागरिकांचा प्रतिसाद
पुणे – शहरातील निम्म्या मिळकतकरधारकांनी मिळकतकरच भरला नसल्याची माहिती समोर आली. पालिका कार्यक्षेत्रात सुमारे 10 लाख 61 हजार इतक्या मिळकती आहेत. या मिळकतींपैकी 30 सप्टेंबर अखेरीस 5 लाख 91 हजार 91 मिळकतकरधारकांनी एकूण 846 कोटी रुपयांचा मिळकतकर भरला.
दरम्यान, मिळकतधारकांनी विविध कारणांमुळे वेळेवर मिळकतकर न भरल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार दरमहा 2 टक्के शास्ती लावण्यात आलेला आहे. ही शास्ती दरमहा 2 टक्के असल्यामुळे ती वाढत जाऊन थबबाकीची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2 ऑक्टोबरपासून ज्या मिळकतीवर 50 लाखांपेक्षा कमी थकबाकी आहे, अशा मिळकतकर थकबाकीवर 2 टक्के व्याजाच्या रकमेवर 80 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली.
संबंधित थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकी भरावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.