कंधार हवाई हल्यात 80 दहशतवादी ठार

तालिबानी कमांडर सरहदीदेखील ठार

काबुल – अफगाणिस्तानच्या कंधारमध्ये रविवारी झालेल्या हवाई हल्यात 80 हून अधिक दहशतवादी ठार आहे. यामध्ये तालिबानी संघटनेचा प्रमुख सरहदी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता फवाद अमान यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ही घटना कंधारमधील अरघनदाब जिल्हात झाली असून अशावेळी करण्यात आली ज्यावेळी ते एका हल्लाची तयारी करीत होते. ह्या घटनेची पुष्टी फवाद अमान यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन दिली.

ही घटना कंधारमधील अरघनदाब जिल्हात झाली असून अशावेळी करण्यात आली ज्यावेळी ते एका हल्लाची तयारी करीत होते.

चीनमधील सिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, या हवाई हल्याच्यादरम्यान दहशतवादी आणि त्यांच्या प्रमुखाचा मृत्यू झाला असून यामध्ये गाड्या आणि टाक्यादेखील उडविण्यात आल्या आहेत. परंतु, आतापर्यंत तालिबानींकडून यावर कोणतेच विधान जारी करण्यात आले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.