राज्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला

ऑक्‍सिजन बेडचा ताण वाढला अनेक जिल्ह्यात दयनीय स्थिती

मुंबई – राज्यात करोना बाधितांच्या संख्येत झालेल्या झपाट्याने वाढ होत असल्याने राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर विलक्षण ताण येत आहे. राज्यात ऑक्‍सिजन बेडचा तुडवडा निर्माण होताच गेल्या काही दिवसांत मागणी वाढल्याने ऑक्‍सिजन सिलिंडरचा दर वाढला असल्याचे चित्र आहे. राज्यात सक्रीय बाधितांची संख्या चार लाख 10 हजार 172 आहे.

औरंगाबाद सारख्या भागात बाधितांची संख्या झपाट्याने वाढल्याने अत्यंत वाईट स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दोन हजार ऑक्‍सिजन बेड शिल्लक होते, ते आठवड्याच्या अखेरीस पर्णपणे भरले होते. करोनाच्या सक्रीय बाधितांच्या संख्येने 87 हजाराचा आकडा ओलांडला आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. खासगी रुग्णालय आणि अनेक उद्योग संस्थांकडून मदत मागण्यात आली आहे.

आम्ही जिल्ह्यातील खासगी क्षेत्राकडून मदत मागितली आहे. सध्या आम्हाला सर्व शक्‍य त्या मार्गाने मदत हवी आहे. आमच्या मदतील धावून येण्यासाठी 10 खासगी रुग्णालये तयार झाले आहेत. लोकांनी काळजी घ्यावी आणि कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे. निर्बंध का लादतात असा अक्षेप अनेक जण घेत आहेत. मात्र त्यांनी प्रत्यक्षातील परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. आम्ही आमचे प्रयत्न वाढवत असताना जर नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर बाधितांची संख्या अशीच वाढत राहील आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असे ते म्हणाले.

जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे आणखी 150 आयसीयु व्हेंटिलेटर पुरवण्याची मागणी केली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी मागणी केल्यानंतर तशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सर्व ऑक्‍सिजन राखीव
राज्यात सध्या 700 ते 750 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची आवश्‍यकता आहे. केवळ औरंगाबादमध्येच 50 मेट्रिक टन ऑक्‍सिजनची आवश्‍यकता आहे. त्यामुळे रुग्णालयांना ऑक्‍सिजन बेडस्‌ची कमतरता जाणवत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अलीकडेच 80 टक्के ऑक्‍सिजन वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के ऑक्‍सिजन औद्यागिक वापरासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बाधितांची वाढती संख्या पाहून शंभर टक्के ऑक्‍सिजन वैद्यकीय कारणांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यात सध्यातरी ऑक्‍सिजन तुटवडा नसला तरी काळजीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा हा सर्वच दृष्टीने सधन आहे. अनेक जण राज्याबरोबरच परराज्यांतून कोल्हापुरात व्यवसाय करण्यासाठी येतात. त्यातच कोल्हापूरची औद्योगिक नगरी म्हणून सर्वत्र ओळख आहे. त्यामुळे पर्यायाने रोजगारासाठी हजारो हात कोल्हापुरात काम करत असतात मात्र या कोरोणाच्या संकटात काहींच्या हाताचा रोजगार कायमचा गेला आहे मात्र तरीही कोरोना च्या पहिल्या लाटे नंतर दुसऱ्या लाटेला थोपवत पुन्हा एकदा उभारी घेण्याचा प्रयत्न केलाय. वाढत्या कोरोना संसर्गाचा निमित्ताने सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती फारच बिकट होताना दिसत आहे. याचे कारण दररोज वाढणारी कोरोणाची रुग्णसंख्या. आज या रुग्ण संख्येने 52 हजार चा टप्पा ओलांडला आहे तर 49 हजार 626 रुग्णांना उपचार पूर्ण करून घरीही पाठवल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.