बेल्हे (प्रतिनिधी) – बेल्हे (ता. जुन्नर) येथे शनिवार (दि. २५) २ करोना पाॅझिटीव्ह एकुण रूग्न संख्या ८ झाली आहे. बेल्हे येथील एका फर्निचर व्यावसाईकाला करोना सदृश्य लक्षन जाणवल्याने त्यांनी प्रायव्हेट लॅब अहमदनगर येथे कोविड तपासणी केली. त्यात ते पाॅझिटीव्ह आढळुन आले आहेत.
तर बेल्हे येथील पाईपचे दुकानदार यांच्या घरातील एका तरूणाला लक्षन असल्यामुळे लेण्याद्री येथे स्वब घेण्यात आले. त्या तरुणाचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला असल्याचे बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. बी. थोरात यांनी सांगीतले.
बेल्हे येथील अजून ७ जणांचे अहवाल प्रतीक्षेत असून आज संध्याकाळ पर्यंत येणे अपेक्षित आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व घरातील व्यक्तींचे स्वब तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. तर, गावातील मागील आठवड्यात पुणे येथे उपचार घेत असलेले ४ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत.
गावात रुग्णसंख्या व वाढत असल्याने सर्वांनी विनाकारण बाहेर न फिरता घरातच राहण्यावे तसेच शासकीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन डॉ. थोरात यांनी नागरिकांना केले आहे.