सातारा – जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 73 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले, तर 252 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील 18, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 21, कोरेगावातील सात, फलटणमधील दहा, वाईतील 15, खंडाळ्यातील चार, रायगावमधील 12, पानमळेवाडीतील 53, महाबळेश्वरमधील 10, दहिवडीतील 35, म्हसवडमधील आठ, पिपोंडे येथील चार व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 55, अशा एकूण 252 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
करोनाची सद्य स्थिती
घेतलेले एकूण नमुने – 271263
एकूण बाधित – 53832
घरी सोडण्यात आलेले – 50684
मृत्यू – 1782
उपचारार्थ रुग्ण – 1366