नवी दिल्ली – आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात करोनाची लागण झालेल्या 7 हजार 189 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ओमायक्रॉनच्या धोक्याच्या दरम्यान, मागील दिवसाच्या तुलनेत आज करोना संक्रमित प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. आजच्या एक दिवस आधी म्हणजेच काल देशात 6 हजार 650 रुग्ण आढळले होते.
India reports 7,189 new #COVID19 cases, 7,286 recoveries, and 387 deaths in the last 24 hours.
Active cases: 77,032
Total recoveries: 3,42,23,263
Death toll: 4,79,520Total number of #Omicron cases 415
Total Vaccination: 141.01 Cr pic.twitter.com/BLiT1E5rjZ
— ANI (@ANI) December 25, 2021
त्याच वेळी, गेल्या 24 तासात 387 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 7 हजार 286 लोक करोना संसर्गातून बरे झाले आहेत. या आजारातून बरे झालेल्या लोकांची एकूण संख्या ३,४२,२३,२६३ झाली आहे. अहवालानुसार संपूर्ण देशात 77 हजार 032 सक्रिय रुग्ण आहेत.