राजस्थानमधील 70 आयएएस अधिकाऱ्यांची बदली

जयपूर – राजस्थानमधील 70 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून यात 10 जिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याबाबत सरकारकडून नुकताच आदेश जारी करण्यात आला आहे. यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या ओएसडी यांचाही समावेश आहे.

राज्याचे अतिरिक्‍त मुख्य सचिव (प्रशासकीय) रविशंकर श्रीवास्तव यांची राजस्थान रस्ते वाहतूक महामंडळाच्या अध्यक्षपदी बदली करण्यात आली आहे. अतिरिक्‍त मुख्य सचिव (औद्योगिक) सुबोध अग्रवाल यांची एमएसएमई विभागात, तर एमएसएमईचे प्रधान सचिव अलोक यांची आरएसआरटीसीच्या एमडीपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

राज्यातील भरतपूर, धोलपूर, सिकार, करौली, टोंक, चित्तोडगड, बनसवाडा, प्रतापगड, कोटा आणि डुंगरपूर आदी ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.

धोलपुरच्या जिल्हाधिकारी नेहा गिरी यांची बदली जयपूरमधील आदिवासी विकास विभागात सहसचिव, तर चित्तोडगडचे जिल्हाधिकारी शिवांगी स्वर्णकार यांची उदयपूरच्या आयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.