शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील 5 गावांत 7 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. यामध्ये तालुक्यातील कवठे यमाई 1, रांजणगाव गणपती 2, शिक्रापूर 1, तळेगाव ढमढेरे 1, शिरूर शहर 2 असे पाच गावांत सात करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्याची संख्या 656 वर गेली आहे.
करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 84 जणांची तपासणी करण्यात आली आहे. शिरूर शहरातील गुजर मळा येथे 38 वर्षीय पुरुष तर छत्रपती कॉलनी येथील 36 वर्षीय महिला करोनाबाधित आढळले आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शिरूर शहरातील रुग्णांची संख्या आत्तापर्यंत 121 झाली आहे. यापैकी 61 जणांनी करोनावर मात केली आहे. यामध्ये शिरूर सुभाष चौकातील 82 वर्षीय माजी शिक्षकाने करोनावर मात केली आहे. शिरूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागांत जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.
शिक्रापूर परिसरात तीनजणांना करोना
शिक्रापूर (वार्ताहर) – शिक्रापूरसह परिसरात सोमवारी (दि. 10) तीन जणांना करोनाची बाधा झाली आहे. यामध्य शिक्रापूर 1, तळेगाव ढमढेरे 1 तर कोरेगाव येथे 1 असे 3 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली आहे.