उजनीतून भीमेत 60 हजार क्‍युसेक पाणी

पंढरपूर (प्रतिनिधी) – भीमा खोरे व घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसाने दौंडची आवक रविवारी सकाळपासून वाढत चालली आहे. यामुळे उजनीतून भीमेत 60 हजार क्‍युसेक पाणी सांडव्यातून, तर 1600 क्‍युसेक वीजनिर्मितीसाठी सोडले जात होते. आता भीमा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दरम्यान नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नीरा साखळी धरणांवर पावसाचा जोर असल्याने वीरमधून काल 13 हजार व नंतर सायंकाळी 4500 क्‍युसेक पाणी सोडले जात आहे. वीर व उजनीच्या पाण्याने भीमानदी संगमच्या पुढे 60 हजार क्‍युसेकने वाहण्याची शक्‍यता असल्याने सर्व बंधारे व पंढरीतील दगडी पूल पाण्याखाली जाईल.

उजनी धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. यामुळे कॅनॉल, वीज निर्मिती, बोगदा, सीना माढा यासह दहिगाव योजनांमध्ये पाणी सोडले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.