व्हॉट्‌सऍपचे हे आहेत नविन 5 फीचर्स

मुंबई – व्हॉट्‌सऍप हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मॅसेजिंग ऍप आहे. याचा वापर पर्सनल चॅटिंग पासून व्यवसाय आणि कार्यालयीन कामकाजासाठी देखील केला गेला जातो. तसेच, व्हॉट्‌सऍप देखील आपल्या यूजर्संपर्यंत योग्य सुविधा पोहचवण्याचा प्रयत्न नेहमीच करताना दिसून येत असतो. त्यामुळे व्हॉट्‌सऍप सतत अपडेट देखील पाठवत असते.

व्हॉट्‌सऍपने नुकतंच फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आणि कंटिन्यूअस व्हॉईस मेसेज हे अपडेट पाठवले आहेत. त्याचबरोबर इतर तीन नविन अपडेट देखील येऊन गेले आहेत. जाणून घ्या व्हॉट्‌सऍपने आणखी कोणते नवे फीचर आणले आहेत.

व्हॉट्‌सऍप रॅंकिंग

व्हॉट्‌सऍपचं हे फीचर आता सध्या बीटा फेजमध्ये आहे. या फीचरच्या मदतीने आपल्याला सगळ्यात आधी ते कॉन्टॅक्‍ट दिसणार आहेत. ज्यांच्याशी आपण जास्त चॅट करतात. म्हणजेच आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला आपलं व्हॉट्‌सऍप कॉन्टॅक्‍ट रॅंकिंग सेट करु शकतात. हे फीचर आपल्याला आपल्या त्या लोकांशी चॅट करण्यात मदत करेल, ज्यांच्याशी आपण सतत चॅटिंग करतात.

फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन:

व्हॉट्‌सऍपने नुकतंच फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन हे फीचर आणलं आहे. ज्याच्या मदतीने आपण आपलं व्हॉट्‌सऍप अधिक सुरक्षित केलं आहे. हे फीचर आयफोन यूजर्स आणि अँड्रॉईड यूजर्स अशा दोघांसाठी उपलब्ध आहे. आयफोन यूजर्संना व्हॉट्‌सऍप व्हर्जन 2.19.20 हे फीचर मिळेल, तर अँड्रॉईड स्मार्टफोनवर व्हॉट्‌सऍप व्हर्जन 2.19.221 हे फीचर मिळेल.

व्हॉट्‌सऍप पेमेंट:

व्हॉट्‌सऍप पेमेंट फीचरची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. यासाठी व्हॉट्‌सऍपला आरबीआय आणि एनपीसीआयची परवानगी मिळणं गरजेचं आहे. व्हॉट्‌सऍपचं हे फीचर जवळजवळ 10 लोकांकडे आहे. ज्याच्या मदतीने आर्थिक व्यवहार करता येणार आहे. त्यामुळेच व्हॉट्‌सऍपला हे फीचर लवकरात लवकर लॉंच करायचं आहे.

कंटिन्यूअस व्हॉइस मेसेज फीचर:

व्हॉट्‌सऍप हे फीचर 2019 मध्येच लॉंच केलं आहे. या फीचरच्या मदतीने आपण सतत येणारे व्हॉईस कॉल मेसेज थेट ऐकू शकता. या फीचरच्या मदतीने आपल्याला एकापाठोपाठ एक व्हॉईस मेसेज प्ले करावे लागणार नाहीत. जर आपण एकदा मेसेज प्ले केल्यानंतर पुढील सगळे मेसेज हे आपोआप प्ले होत राहतील.

व्हॉट्‌सऍप पिक्‍चर इन पिक्‍चर:

व्हॉट्‌सऍपने नुकतंच पिक्‍चर इन पिक्‍चर किंवा पीआयपी मोड हे फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने आपल्याला एखादी व्हिडिओ लिंक पाहण्यासाठी त्या लिंकच्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज भासणार नाही. तर व्हॉट्‌सऍपच्या या फीचरच्या मदतीने व्हिडिओ हा व्हॉट्‌सऍप चॅटमध्येच पाहता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.