वॉशिंग्टन – अमेरिकेतील मिशिगन मधील रहिवासी असलेल्या स्टेन लारकिन याचे आयुष्य अत्यंत आव्हानात्मक असून कमकुवत हृदय असलेल्या स्टेनने दात्याच्या प्रतीक्षेत तब्बल पाचशे पंचावन्न दिवस हृदया शिवाय आयुष्य जगण्याचा अनुभव घेतला या 555 दिवसांच्या कालावधीमध्ये त्याला जिवंत ठेवण्याचे काम सिंक आर्केडिया नावाच्या एका उपकरणाने केले.
जे कृत्रिम हृदयासारखे काम करत होते हृदयाचे दोन्ही भाग जेव्हा काम करणे बंद करतात तेव्हा अशा प्रकारच्या उपकरणाचा वापर जातो वयाच्या सोळाव्या वर्षी स्टेनला आपले हृदय अत्यंत कमकुवत असल्याची जाणीव झाली होती एक दिवस बास्केटबॉल खेळता खेळता अचानक तो बेशुद्ध पडला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्या सर्व तपासण्या झाल्यावर त्याचे हृदय अत्यंत कमकुवत असल्याचा रिपोर्ट समोर आला.
कोणत्याही क्षणी मोठा हार्ट अटॅक येऊन स्टेनचा जीव जाण्याचा धोका होता त्याच्या कुटुंबातील सर्व जणांना अशाप्रकारे हृदयविकाराचा त्रास होता वयाच्या पंचविसाव्या वर्षी स्टेनला कृत्रिम हृदय बसवण्यात आलं हृदयाचे प्रत्यारोपण करूनच त्याचा जीव वाचवणे शक्य होते पण दाता मिळणे अवघड होत असल्यानेच त्याला कृत्रिम हृदय बसवण्यात आले.
कृत्रिम हृदय एका पोर्टेबल बॅगच्या स्वरूपात त्याच्या पाठीवर बसवण्यात आले होते या उपकरणांचे वजन 6 किलो होते पण हे हृदय शेवटी एक यांत्रिक उपकरण असल्यामुळे काही कारणाने हे हृदय 22 वेळा बंदही पडले.
त्या कालावधीमध्ये स्टेनला काम करणे अशक्य झाले होते अशाप्रकारे हृदयाचे प्रत्यारोपण होईपर्यंत तब्बल पाचशे पंचावन्न दिवस या कृत्रिम रुदयाचा सहारा घेऊन स्टेनला आपले जीवन व्यतीत करावे लागले पण आता त्याच्या शरीरात कृत्रिम ह्रदयाचे प्रत्यारोपण झाल्याने त्याचा त्याची प्रकृती आता खूपच सुधारली आहे