हडपसर – आळंदी आणि देहू वरून पंढरपूरला दरवर्षी भक्ती भावाने लाखो वारकरी जात असतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेली २ वर्षे पायी वारी झाली नाही. हडपसर वरून दोन्ही पालख्या पुढे जात असल्याने पालखीच्या दिवशी सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते ते यंदा देखील नसल्याने भाविक नाराज झाले आहेत.
हडपसर सायकल क्लब तर्फे गेली चार वर्षे हडपसर ते पंढरपूर आणि परत हडपसर अशी सायकल वारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा ह्या उपक्रमात २५ सायकल वारकरी सहभागी झाले होते. वय वर्षे १३ ते ६१ मधील हडपसर वासिय या उपक्रमात सहभागी झाले होते.
३ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता हडपसर मधून ह्या उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
हडपसर, यवत, पाटस, भिगवन, इंदापूर, अकलूज मार्गे पंढरपूर असा जाताना चा मार्ग होता. दुपारी ४ वाजता ही सायकल वारी पंढरी च्या चरणी विसावली. हे सगळे सायकल वीर चंद्रभागेत स्नान करून नामदेव पायरी चे दर्शन घेऊन धन्य झाले.
सायकल वारी ने इंदापूर आणि पंढरपूर येथे परंपरे प्रमाणे रिंगण ज्या ठिकाणी होते तेथे सायकल रिंगण घेतले. रात्रीचा मुक्काम पंढरपूर येथे मांजरी येथील मांजराई देवी वारकरी निवास येथे करून दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता हे सायकल स्वार परत सायकल वर हडपसर च्या दिशेने मार्गस्थ झाले. <span style=”text-transform: initial;”>येताना फलटण, जेजुरी, सासवड मार्गे हडपसर असा मार्ग होता.</span>
सुनिल सादिगळे, संतोष मोहिते, प्रशांत हरपळे, सतीश काळभोर, उमेश टकले, राहूल झेंडे, संदिप हिंगणे, पृथ्वीराज आबा शिंदे, आप्पा थोरात, आयर्न मॅन सुखदेव सिंग, विजय गायकवाड, जनार्दन शिवरकर, अमित तुपे, कृष्णा जाधव, राम चौधरी, योगेश पडोळे, रमेश पोवार, संतोष वाल्हेकर, अंकुश जाधव, विकास लडकत, क्षोन हिंगणे,
हिमेश अग्रवाल, गणेश शिंदे, हितेन माहेश्वरी ह्या सायकल पटूनी यात सहभाग घेतला.
आळंदी येथील हनुमंत गंगठडे आणि देवा महाराज यांनी या मोहिमेचे सारथ्य केले. हडपसर सायकल क्लब चे अनेक जण सभासद असून परिसरात सायकल चालवा अशी जन जागृती ते सतत करत असतात. यंदा त्यांनी सायकल वर पंढरीची वारी करून अनोखा उपक्रम राबविला.