मेडद येथे आरोग्य शिबिरात 500 जणांची तपासणी

बारामती- मेडद (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी (दि. 30) आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 500 जणांची तपासणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून चष्मा तसेच काठीचे देखील वाटप करण्यात आले. या शिबिरास बारामती शहरातील गावडे, देशपांडे हॉस्पिटल तसेच फलटण येथील माणुसकी फाउंडेशन व लायन्स क्‍लब पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले.

मेडद गावच्या सरपंच डॉ. उज्वला पांडुरंग गावडे यांच्या पुढाकारातून हे शिबिर यशस्वी करण्यात आले. शिबिरात मोफत कॅल्शियम, हाडाची ठीसुळता, हृदयरोग, हिमोग्लोबीन, शुगर, किडनी, लिव्हर, थायरॉईड, कॅन्सर मार्कर निदान, रक्ताच्या सर्व तपासण्य शिबिरात करण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, सभापती नीता बारवकर उपस्थित होत्या. शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पांडुरंग गावडे, बाल रोग तज्ज्ञ अश्‍विनकुमार वाघमोडे, पोटविकार तज्ज्ञ तुषार शिंदे, स्त्री रोग तज्ज्ञ अजित देशमुख, देशपांडे हॉस्पिटल येथील डॉक्‍टर्स तसेच डॉ. विजय कोकणे यांनी तपासण्या व उपचार केले.

या शिबिरासाठी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक सदानंद काळे, रुई ग्रामीण रुग्णालयचे डॉ. दराडे , महिला शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक भोई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे , लोणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माने, डॉ. बोबडे व डॉ .सुहास ननवरे यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमासाठी उपसरपंच अमोल सावंत, ग्रामसेवक विनायक गावडे, संतोष यादव, सुमन गावडे, रमेश गावडे, अजित कांबळे, सीताराम कांबळे, अंगणवाडी कर्मचारी व गावडे हॉस्पिटलचे कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक डॉ. पांडुरंग गावडे, सूत्रसंचलन अनिल रुपनवर पाटील यांनी केले.

मेडत ग्रामपंचायतीच्या वतीने व सर्वांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पाचशे रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात येणार आहेत. शहरातील विविध रुग्णालये तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला. गरजू रुग्णांना त्यामुळे उपचार घेणे शक्‍य झाले .शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
– डॉ. उज्वला गावडे, सरपंच, ग्रामपंचायत मेडद

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.