‘कोरोना’पासून वाचण्यासाठी प्रतिकारशक्‍ती वाढवा

डॉक्‍टरांकडून आवाहन : व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नाही

पिंपरी – कोरोना व्हायरस हा स्वाइन फ्लू सदृश्‍य आजार आहे. या आजारांने चीनमध्ये धूमाकूळ घातला असून आतापर्यंत 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्येही या आजाराचा शिरकाव झाला असून केरळ या राज्यामध्ये पहिला रुग्ण आढळला आहे. या व्हायरसवर लस उपलब्ध नसून प्रतिकारशक्ती वाढविण्याचे आवाहन डॉक्‍टरांची संघटना “निमा’ या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

निमा संस्थेचे सचिव डॉ. अभय तांबिले म्हणाले, कोरोना व्हायरसची लागण झाल्यावर तीव्र स्वरुपाचा ताप येतो. हा ताप सुमारे 103 अंश सेल्असिच्या पुढे असतो. तसेच घसा दुखणे, लाल होणे, नाकातून पाणी येणे अशी लक्षणे आढळतात. यासोबतच मोठ्या प्रमाणावर सांधेदुखीचा त्रास होतो. सर्दी व तापामुळे अशक्तपणा येऊन माणसाची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. या व्हायरसची लागण प्रामुख्याने प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना लवकर होते. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया यांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. तसेच एचआयव्ही, मधुमेह, दमा, फुफ्फुसाचे आजार असणाऱ्या व्यक्तिंना या आजाराची लवकर लागण होते.

या आजाराला न घाबरता त्यासाठी योग्य काळजी घेतली पाहिजे. बाहेरुन आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावेत. शिंकताना व खोकताना नाका-तोंडावर हातरुमाल धरावा. आहाराची विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. शिळे अन्न खाणे टाळावे, सकस व ताजे अन्न घ्यावे. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. तसेच मांसाहर करू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

काय उपाय करावे…
– भरपूर प्रमाणात पाणी प्या
– मांसाहार टाळा.
– व्हिटॅमिन सी युक्त फळे खा ( आवळा, लिंबू, मोसंबी, संत्री)
– तुळसी, आले, वेलदोडे यांचा चहामध्ये वापर करा.
– पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करा.

पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात उपचार कोरोना व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे हा उपाय आहे. पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात या आजारावर उपचार केले जातात. तसेच कोरोना व्हायरसचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हारॉलॉजी पुणे येथे तपासले जातात. या व्हायरसचे लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करणे आवश्‍यक आहे.
– डॉ. अभय तांबिले, सचिव निमा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.