सातारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.
शिंदे-भाजप सरकार स्थापन होताच आ. शिवेंद्रराजेंनी सातारा- जावळी मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळविण्याचा धडाका सुरू केला आहे. 2022- 23 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत सातारा तालुक्यातील रस्त्यांसाठी पाच कोटी निधी उपलब्ध करून घेतला आहे. शासनाने मंजूरी दिलेल्या कामांमध्ये मौजे अनावळे अप्रोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण 20 लाख, मौजे अटाळी अप्रोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण 20 लाख, मौजे अष्टेअंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण 25 लाख, मौजे नित्रळ अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 10 लाख,
मौजे निगुडमाळ अंतर्गत रस्ते कॉकिटीकरण 10 लाख, मौजे अंबवडे खुर्द अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण 25 लाख, मौजे सायळी अंतर्गत रस्ते कॉकिटीकरण करणे 20 लाख, मौजे नुने अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 10 लाख, मौजे सैदापूर अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 10 लाख, मौजे भाटमरळी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 10 लाख, मौजे सैदापूर येथे गणेश कॉलनी अंतर्गत मनोहर कुर्लेकर घरासमोर रस्ता करणे 8 लाख, मौजे सैदापूर सातारा मेढा रस्ता ते माळवाडी पोहोच रस्ता करणे 10 लाख, मोजे कोंदणी अंतर्गत रस्ता कांजाई मंदिर कॉंक्रिटिकरण व डांबरीकरण10 लाख, मौजे बेन्डवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे 7 लाख, मौजे कुसवडे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटिकरण व डांबरीकरण 10 लाख,
मौजे कुमठे अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 10 लाख, मौजे यवतेश्वर रस्ता कॉंक्रिटिकरण व डांबरीकरण 10 लाख, मौजे पिलाणीवाडी येथे अंतर्गत रस्ता कॉंक्रिटिकरण व डांबरीकरण 10 लाख, मौजे राकुसलेवाडी जानाई मंदिर रस्ता खडीकरण व डांबरीकरण मौजे कुरुळवाजी अंतर्गत रस्ते करणे 10 लाख, मौजे सावली अंतर्गत रस्ते डांबरीकरण 10 लाख, मौजे कारी बेडेकरवाडी रस्ता करणे 10 लाख, अंबवडे खुर्द येथे सातारा परळी सज्जनगड रस्ता ते भैरवनाथ मंदिर पर्यंत रस्ता कॉंक्रिटिकरण व डांबरीकरण करणे 10 लाख, मौजे करंजे तर्फ परळी अंतर्गत रस्ता करणे 10 लाख, मौजे वावदरे येथे अंतर्गत रस्ता करणे 10 लाख, मौजे कारी बेडेकर वस्ती अंतर्गत रस्ता करणे 10 लाख,
मौजे ताकवली येथे संरक्षक भिंत बांधणे 10 लाख, कारी करंडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 15 लाख, मौजे केळवली ते दत्तवाडी रस्ता करणे 20 लाख, कुडेघर अप्रोच रस्ता डांबरीकरण करणे 15 लाख, मौजे खडगाव अंतर्गत रस्ता करणे 20 लाख, मौजे कुस खुर्द अप्रोच रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख, मौजे आंबेवाडी अप्रोच रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख, मौजे वडगाव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे 10 लाख, मोजे कुस खुर्द सभामंडप उर्वरित काम करणे 10 लाख, शेंद्रे अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण 15 लाख, मौजे शेळकेवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 15 लाख, मौजे सोनगाव तर्फ सातारा अप्रोच रस्ता खडीकरण व डांबरीकरण 15 लाख, मौजे सोनवडी अंतर्गत रस्ता डांबरीकरण 20 लाख इत्यादी कामांचा समावेश आहे. या सर्व कामांच्या निविदा प्रक्रिया व इतर सोपस्कर तातडीने पूर्ण करून कामे सुरू करण्याबाबत तसेच कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करण्याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.