रोम – इटालित शुक्रवारी एकाच दिवशी करोना रोगामुळे 49 जणांचे बळी गेल्याने त्या देशातील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 197 झाली आहे. चीन नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात करोनाचे बळी जाणारा इटाली हा दुसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. इटालित करोनाची लागण झालेल्यांची संख्याही अचानक मोठ्या प्रमाणात वाढली असून आता हा आकडा 4636 इतका झाला आहे.
देशाच्या सर्वच भागात हे रूग्ण आढळून आल्याने त्या सरकारचा धाबे दणाणले आहे. तेथील रूग्णालयांमध्ये करोना बाधितांसाठी वेगळी सोय करण्यात आली असली तरी ही सोयही आता कमी पडू लागल्याने नव्याने तेथे काही व्यवस्था करावी लागत आहे. इटालित अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेल्या करोना रूग्णांची संख्याही आता 462 वर पोहचली आहे.