नवी दिल्ली – ब्रिटन व अमेरिकेतील लोकशाही आदर्श मानून भारताने तिचे अनुकरण करावे असे म्हणणे हे हास्यापद आहे. सदर दोन देशातील लोकशाहीची कार्यवाही व तेथील लोकशाहीची संस्था यातील अनेक उणिवांची उदाहरणे देता केवळ लोकशाहीच्या नावाखाली काही गोष्टी या दोन देशांत घडल्या म्हणून ते देश काही खरेखुरे लोकशाहीवादी होत नाहीत. पाश्चिमात्य देशातील प्रत्येक गोष्ट चांगली व आपल्या देशातील प्रत्येक गोष्ट वाईट आहे, असे आपल्याकडील लोक “उसणे’ निकष लावून ठरवतात.
बेळगाव कुणाचे?
बंगलोर – बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य भाग असून तो तसाच राहील असे एस. कृष्णा यांनी सांगितले. ते म्हणाले, महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही राज्याने फायदा उठवावा असा पेचप्रसंग कर्नाटकात निर्माण झालेला नाही. या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटतील.
आयात धोरणानुसार मागील आधारावर नवे परवाने
नवी दिल्ली – मागील वर्षाच्या वापराच्या आधारावर उद्योगांना आपोआप देण्यात यावयाचे आयात परवाने आणि जादा आयात परवान्यांसाठी सरकारने निवडक उद्योगधंद्यांची बनविलेली यादी हे 1975-76च्या केंद्राने जाहीर केलेल्या आयात धोरणांचे वैशिष्ट्य आहे.