पुणे – श्री लक्ष्मी कृपा अर्बन बॅंकेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी बॅंकेच्या सभागृहात सरकारच्या निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
या सभेमध्ये विषयपत्रिकेवरील सर्व विषय नियमानुसार हाताळण्यात आले. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष ऍड. रामराव देशमुख यांनी सभासदाशी बॅंकेच्या कामकाजाबाबत संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सभासदांनी बॅंकेच्या प्रगतीसाठी कामकाजात लक्ष घालावे.
आपल्या ठेवी आणि कर्ज व्यवहार बॅंकेतून करावेत. त्यामुळे बॅंकेची प्रगती होऊ शकेल असे ते म्हणाले. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश निकम यांनी संस्थेचा पाया आणखी भक्कम करण्यासाठी स्वनिधीची गरज असल्याचे स्पष्ट केले. विषय पत्रिकेप्रमाणे कामकाज पाहून सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीने चार टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय झाला.