पुणे – थर्ड आय स्पोर्टस अँड इव्हेंटस एलएलपी यांच्या वतीने आयोजित पहिल्या थर्ड आय १६ वर्षाखालील क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत साखळी फेरीत सनराईज क्रिकेट स्कूल, स्पोर्टिव्ह क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
सनराईज क्रिकेट स्कुल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सनराईज क्रिकेट स्कूल संघाने बीस्पोर्ट संघाचा १२९ धावांनी पराभव करून धडाकेबाज सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात स्पोर्टिव्ह क्रिकेट अकादमी संघाने एके स्पोर्टस संघावर ५६ धावांनी विजय मिळवला.
स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेतील माजी खेळाडू पंकज कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अभिषेक अग्रवाल उपस्थित होते.