हिंगोली – औंढा नागनाथ ते परभणी रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 38 किलो गांजा पकडला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. शेख गौस शेख पाशा (वय 32, पूर्ण, परभणी), रविंद्र अमरसिंग राठोड (वय 34, वाशिम), शेख मोईनोद्दीन शेख अलिमोद्दीन (वय 36, पूर्णा परभणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी 38 किलो गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकुण 14 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदारामार्फत औंढा ते परभणी रोडवरील औंढा विश्रामगृहासमोर गांजाची अवैध वाहतूक करणारी कार उभी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये गांजा आढळून आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून 14 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अलीकडील काळात या भागात गांजा पकडलेली हि सर्वात मोठी कार्यवाही आहे.
ही कारवाई, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. पंडीत कच्छवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार संभाजी लकुळे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर पायघन, गणेश लेकुळे, चालक तुषार ठाकरे, प्रशांत वाघमारे, रविकांत हरकाळ, गजानन गिरी, पंजाब थिट्टे यांनी केली.