मुंबई – लग्नाआधी देवेंद्रजी एका बैठकीत 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासह सहज खायचे, असं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात धमाल उडवून दिली होती.
मात्र आता खुद्द फडणवीसांनी आपल्याला पुरणपोळीच आवडत नसल्याचं सांगितलं आहे. तर फडणवीसांना नेमका कोणता पदार्थ आवडतो हे आता स्वतः त्यांनीच सांगितलं आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल खुलासा केला आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मला पुरणपोळी आवडते असं वक्तव्य त्यांच्या पत्नी अमृता यांनी एकदा केलं होतं. एका बैठकीत 35 पुरणपोळ्या पातेलंभर तुपासह सहज खाऊ शकतो असं त्या म्हणाल्या होत्या. मात्र, मी फार तर एखादी पुरणपोळी खाऊ शकतो, त्यापेक्षा जास्त नाही.
होय मला गोड पदार्थ खायला आवडतात पण मी फक्त डार्क चॉकलेट आवडीने खाऊ शकतो. हे खरं आहे, पण मी फ्रीजमधलं बाकी काहीच खात नाही, मला डार्क चॉकलेट्स खूप आवडतात आणि ते मी खातो. मी रात्री 12 वाजता 2-3 वाजता केव्हाही आलो की फ्रीज उघडतो आणि डार्क चॉकलेट खातो.’ असं यावेळी फडणवीस म्हणाले.