अकलूज – शंकरनगर (ता. माळशिरस) येथील सहकार महर्षि शंकरराव मोहितेपाटील साखर कारखान्याच्या 3 लाख 1 व्या साखर पोत्याचे पूजन संचालक भिमराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याच्या 2019-20 चा ऊस गळीत हंगाम 24 नोव्हेंबर रोजी सुरु झाला.
आज अखेर 3 लाख 18 हजार 240 मे. टन ऊसाचे गाळप होऊन 3 लाख 16 हजार 150 साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा 10.23 टक्के व आजचा साखर उतारा 11.25 टक्के आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये बुधवार (दि. 8) अखेर 2 कोटी 80 लाख 68 हजार 538 युनीट वीज निर्माण केली आहे.
डिस्टीलरीमध्ये 26 लाख 83 हजार 692 लिटर्स रेक्टिफाईड स्पिरीट, 14 लाख 34 हजार 432 लिटर्स इथेनॉल उत्पादन झाल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.
उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक नामदेव ठवरे, लक्ष्मण शिंदे, विजय माने-देशमुख, विजय पवार, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, विश्वास काळकुटे, रावसाहेब पराडे, सुरेश पवार, माजी संचालक रामचंद्र चव्हाण, मोहन लोंढे, मारुती घोडके, अमरसिंह माने-देशमुख, उपस्थित होते.