देशभर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे जुन्या सिनेमांमधील काही सीनमध्ये करोनाशी संबंधित डायलॉग डब करून ते सीन सोशल मिडीयावर व्हायरल करण्याचा ट्रेन्ड सध्या सुरू आहे. त्यातच “3 इडिएट’मधील एक सीनदेखील असाच व्हायरल झाला आहे.
आमिर खान आणि आर. माधवन पायऱ्यांवर बसले आहेत. तेवढ्यात शरमन जोशी मोठमोठ्यांदा ओरडायला लागतो. “भगवान, मी नॉनव्हेज खाणे सोडून देईन. हजारो अगरबत्त्या पेटवेन. पण फक्त एकच काम कर. व्हायरसला या पृथ्वीवरून उचल रे. नरकात टाकून दे. गरम तेलात तळून काढ रे भगवान.’ असा आरडाओरडा शरमन जोशीने केला.
हा सीन सिनेमातला एक सर्वाधिक लोकप्रिय सीन होता. लोकांनी हा सीन करोना व्हायरसशी जोडला आणि आपल्या प्रातिनिधीक भावना त्याद्वारे व्यक्त केल्या आहेत. “3 इडिएट’मध्ये शरमन जोशीच्या पात्राचे नाव राजू रस्तोगी होते. त्यावरून काही जणांनी “राजू रस्तोगी करोनाच्या विरोधात देवाता लाच देतो आहे.’ अशी कॉमेंट केली आहे. आमिर खान, आर. माधवन आणि शरमन जोशीच्या कॉमेडीतूनच प्रेक्षकांना शिक्षण आणि ज्ञानातील फरक समजावून सांगितला गेला होता.