पुणे – करोनामुळे मंगळवारी एका दिवसांत तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला. पुण्यात करोना मृतांची एकूण संख्या 345 वर पोहोचली आहे. तर शहरात 266 नवे बाधित सापडल्याने त्यांची एकूण संख्या 6 हजार 795 वर गेली आहे.
मृतांमध्ये दौंड येथील 65 वर्षीय महिलेचा 31 मे रोजी मृत्यू झाला आहे. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. तर दि. 1 जून रोजी 10 तर दि. 2 जून रोजी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ससून-10, सह्याद्री-3, वायसीएम, काशीबाई नवले, पूना आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रत्येकी दोन, भारती, जहांगीर, नायडू आणि रूबी हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. यातील बहुतांश व्यक्तींना अन्य जुने आजार होते.
मंगळवारी आलेल्या अहवालानुसार आणखी 266 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 1,543 जणांचे नमुने घेण्यात आले आहे. 2 हजार 331 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 165 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.