नवी दिल्ली – यावर्षी दिनांक 1 फेब्रुवारी पासून 11 मार्च पर्यंत सुमारे 22,500 भारतीय नागरिक युक्रेनमधून भारतात परतले आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत 90 मदतीच्या विमानांच्या फेऱ्या करण्यात आल्या.
यात भारतीय हवाई दलाच्या 14 उड्डाणांचा समावेश होता. मदत उड्डाणे चालवण्यासाठी सरकारने भारतीय हवाई कंपन्यांशी समन्वय साधला होता. ऑपरेशन गंगा अंतर्गत एअर एशिया, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, गो फर्स्ट, इंडिगो आणि स्पाइसजेट या सहा खासगी विमान कंपन्यांनी चार्टर्ड सेवा चालवल्या.
युक्रेनला लागून असलेल्या रुमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाकिया देशांतील भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने एअर एशिया, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, गो फर्स्ट, इंडिगो आणि स्पाइसजेट या सहा खासगी विमान कंपन्यांशी समन्वय साधला होता.
ऑपरेशन गंगा अंतर्गत एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने मिळून 23 मदत उड्डाणे चालवली आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत चालवल्या जाणार्या सर्व उड्डाणांसाठीचे हवाई भाडे संपूर्णपणे सरकारने भरले आहे.
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.