नगर – बाजार समितीत सध्या कांद्याने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. गुरुवारी सुद्धा नेप्ती उपबाजार समितीत प्रथम प्रतवारीच्या गावरान कांद्याला सरासरी 1600 ते 2100 रुपयां दरम्यान भाव मिळाला.
गुरुवारी लिलावासाठी बाजार समितीत 30 हजार 96 क्विंटल आवक झाली होती. यावेळी लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला 1600 ते 2100 रुपये, दोन नंबर कांद्याला 1000 ते 1600 रुपये, तीन नंबर कांद्याला 500 ते 1000 रुपये आणि चार नंबर कांद्याला 100 ते 500 रूपये बाजारभाव मिळाला.
मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे भाव दोन हजारांपेक्षा कमी राहत होते. आता मात्र दराने दोन हजारांचा टप्पा पार केला आहे. गुरुवारी सुद्धा कांद्याचे भाव दोन हजारांपेक्षा जास्त राहिले. याआधी कांद्याचे भाव 2300 रुपयांपर्यंत गेले होते. त्यानंतर गुरुवारी भाव थोडे कमी झाल्याचे दिसून आले.