नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने रविवारी म्हटले आहे की ग्राहक कोणत्याही ओळखपत्र पुरावा आणि फॉर्म भरल्याशिवाय बॅंकेच्या विविध शाखांमधून 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकतील. एसबीआयने म्हटले आहे की 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा ओळखपत्राशिवाय बदलता येतील. एसबीआयचे हे स्पष्टीकरण सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांनंतर समोर आले आहे, ज्यात दावा केला जात होता की 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी ओळखपत्र, आधार कार्ड दाखवण्यासोबतच एक फॉर्मही भरावा लागेल.
रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी 2000 च्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, रिझर्व्ह बॅंकेने नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या काळात लोक बॅंकांमध्ये जाऊन त्यांच्या 2000 च्या नोटा इतर चलनी नोटांसह बदलू शकतात. आता, स्टेट बॅंकेने आपल्या सर्व स्थानिक मुख्य कार्यालयांच्या मुख्य महाव्यवस्थापकांना पाठवलेल्या माहितीमध्ये, 20,000 रुपयांपर्यंतच्या 2,000 रुपयांच्या नोटा कोणत्याही ओळखपत्र पुराव्याशिवाय आणि डिमांड स्लिपशिवाय बदलल्या जाऊ शकतात अशी माहिती दिली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने दोन हजाराच्या नोटा स्वत:च्या खात्यात जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, परंतु ती ग्राहकांच्या केवायसी आणि इतर वैधानिक नियमांवर अवलंबून असेल. 20 मे रोजी पाठवलेल्या माहितीमध्ये स्टेट बॅंकेने म्हटले आहे की 2,000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नाही. 2,000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करण्याची संपूर्ण प्रक्रिया त्रासमुक्त आणि सुरळीत व्हावी यासाठी बॅंकेने आपल्या अधिकाऱ्यांना जनतेशी सहकार्य करण्यास सांगितले आहे.
SBI clarifies that the facility of exchange of Rs 2000 denomination bank notes upto a limit of Rs 20,000 at a time will be allowed without obtaining any requisition slip pic.twitter.com/TP6t2n9oeJ
— ANI (@ANI) May 21, 2023
23 मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार होती मात्र काही लोक शनिवारीच बॅंकेत पोहोचले. एसबीआयने सांगितले की, अशा लोकांना समजावल्यानंतर परत पाठवण्यात आले. काही ग्राहकांनी बॅंकेत 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी डिपॉझिट मशीनचा वापर केला. काही लोकांनी दोन हजाराच्या नोटा खरेदी करून खर्च करण्याचा प्रयत्न केला, मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या नोटिफिकेशननंतर लोक दोन हजाराच्या नोटा बाजारात घेण्यास टाळाटाळ करत आहेत. हे योग्य नाही.