2 हजार रुपयांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 8 नोव्हेंबर 2016 ला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. त्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2000 रुपयांची नवी नोट चलनात आणली गेली होती. ती आता 19 मे 2023 रोजी रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, 30 सप्टेंबरपर्यंत बॅंकेत या नोटा जमा करण्यासाठी आणि बदलून घेण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.
नोटबंदीच्या निर्णयानंतर सोशल मीडियावर मजेदार मीम्स तयार केले जात आहेत.
मराठी मीम माॅंक्स या फेसबुक ग्रुपवर वरील मीम फोटो शेअर करण्यात आले आहेत. तसेच मराठीसह हिंदी, इंग्रजी भाषांमधील ग्रुपमध्येही यांसारखे मजेदार मीम्स बनवले जात आहेत…