mayawati criticizes congress – कर्नाटकमध्ये बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेसने येथे सरकार स्थापन केले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते सिद्धरमय्या यांनी, कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बंगळुरू येथील एका मैदानात हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी विरोधी गटाचे अनेक महत्वपूर्ण नेते मंचावर उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नसलेल्या मायावती यांनी मात्र हा शपथविधी सोहळा काँग्रेसचा जातीवादी चेहरा उघड पाडणारा असल्याची टीका केली.
काय म्हणाल्या मायावती?
“कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने डी.के.शिवकुमार यांना मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री करून पक्षांतर्गत कलह दडपण्याचा प्रयत्न केला आहे, पण दलित आणि मुस्लिम या दोन्ही वर्गातील मतदारांनी एकजुटीने काँग्रेसला मतदान करून काँग्रेसला सत्तेत आणले असताना दलित आणि मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष का?” असा सवाल मायावती यांनी ट्विटद्वारे केला आहे.
काँग्रेसला वाईट दिवस आल्यानंतरच दलित-मुस्लिमांची आठवण येते | mayawati criticizes congress
मायावती यांनी याबाबत केलेल्या आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी, “कर्नाटकात दलित समाजाने मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या दाव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानंतर आता एकाही दलित किंवा मुस्लिमाला उपमुख्यमंत्री न करणे ही काँग्रेसची जातीयवादी मानसिकता दर्शवते, काँग्रेसला त्यांच्या वाईट दिवसातच दलित आणि मुस्लिमांची आठवण येते. दलित आणि मुस्लिमांनी काँग्रेसपासून सावध रहाव.” असा गंभीर आरोप केला आहे.
1. कर्नाटक विधानसभा चुनाव उपरान्त मंत्रिमण्डल में श्री डी के शिवकुमार को उपमुख्यमंत्री बनाकर कांग्रेस ने अपनी अन्दरुनी कलह को थोड़ा दबाने का प्रयास किया है, किन्तु दलित व मुस्लिम समाज की उपेक्षा क्यों, जबकि इन दोनों वर्गों ने एकजुट होकर कांग्रेस को वोट देकर विजयी बनाया।
— Mayawati (@Mayawati) May 20, 2023
दरम्यान, कर्नाटक काँग्रेस सरकारच्या शपथविधी सोहळ्यास नितीश कुमार, एम के स्टॅलिन, शरद पवार, हेमंत सोरेन, फारुख अब्दुल्ला, कमल हसन यांच्यासारखे विरोधी गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे दोन नेते मात्र शपथविधी सोहळ्यास उपस्थित नव्हते.