-->

“मोदी गर्लफ्रेण्ड दो’,‘मोदी बॉयफ्रेण्ड दो”; सोशलवरील ट्रेंडने घातला धुमाकूळ ;मजेदार मिम्सचा पाऊस

नवी दिल्ली : देशात सध्या इंधन, गॅस आणि इतर गोष्टीतील महागाईने सर्व सामान्यांचे कंबरडे चांगलेच मोडले आहे. यातच देशात बेरोजगारीचेही मोठे संकट असल्याचे दिसत आहे. याच बेरोजगारीला कंटाळलेल्या अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केली.

‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसला. मात्र मंगळवारी सोशल नेटवर्किंगवर दोन भलतेच हॅशटॅग ट्रेण्डींगमध्ये दिसले.

“मोदी बॉयफ्रेण्ड दो आणि मोदी गर्लफ्रेण्ड दो” असे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत.

हजारोच्या संख्येने नेटकऱ्यांनी हे हॅशटॅग वापरुन ट्विट केले आहेत. अनेकांनी यावर मजेदार मिम्सही शेअर केलेत.
एक नजर टाकून नक्की काय म्हणतायत नेटकरी…


डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.