गुवाहाटी : मिझोराममध्ये मंगळवारी पावसाने 20 बळी घेतले. त्यात एका इमारतीवर दरड कोसळल्याने चार लहान मुलांसह 10 जण मरण पावले तर पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने बस दरीत कोसळून अन्य 10 जण मरण पावले.
मिझोरामची राजधानी ऐजवालपासून 170 किमीवरील लुंगलॉन भागात ही दरड कोसळली. त्यात 10 जण मरण पावले. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले. जिल्हा आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या जवानांनी मोठ्या संकटांचा सामना करीत दूर्घटनाग्रस्तांना बाहेर काढले.
पॉंगझॉल भागात पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने 32 प्रवाशांसह जाणारी खासगी बस दरीत कोसळली. त्यात दोन लहान मुलंसह नऊ जण जागीच मरण पावले तर अन्य एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अन्य तीघांची प्रकृती चिंताजनक आहे.