पेठ(प्रतिनिधी) : पेठ (ता. आंबेगाव) येथे पाहिले 2 रुग्ण पतीपत्नी कोरोना बाधित असताना आज 4 जण कोरोना बाधित झाल्याने पेठ व सातगाव पठार भागात चिंतेची बाब निर्माण झाली आहे.आज तीन महिला व एक पुरुष असे मुंबई वरून आलेल्या 4 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश ढेकळे यांनी दिली.
पेठ गाव दि 29 मे ते दि 12 जून दरम्यान 14 दिवस पूर्ण बंद ठेवण्यात आले होते.,त्यात आज दि 2 रोजी एकाच कुटुंबातील 4 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत.त्यामुळे पेठ व सातगाव पठार भागातील चिंतेत अधिक भर पडल्याने आता पेठ गावात विशेष दक्षता घेऊन सर्व वाड्या वस्त्या या भागात खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार रमा जोशी यांनी सांगितले.
चार पैकी एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती 70 वर्ष वयाची आहे.मुंबई हुन आलेले हे कुटुंबातील 3 महिला व एक पुरुष आहे.आतापर्यंत पेठ गावात पाहिले 2 व आताचे 4 असे 6 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पेठ व सातगाव पठार भागातील नागरिकांची झोप उडाली आहे.,सर्वात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे,कामगार तलाठी हेमंत भागवत ,पोलीस कैलास कड यांनी पेठ गावात सर्वत्र नाकाबंदी केली असून या सहा जणांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना होम कॉरंटाइन करण्यात आल्याची माहिती उपसरपंच अनिल सणस,संतोष धुमाळ, अशोक राक्षे यांनी दिली.
गावात पोलिसांची जादा कुमक नेमून 14 दिवस कोणत्याही व्यक्तीला बाहेर फिरता येणार नाही.बँका, पोष्ट,दुकाने ,शाळा आदी सर्व बंद देवण्यात आले आहे.,कुटुंब सर्वेक्षण मात्र रोज अंगणवाडी, प्राथमिक ,माध्यमिक शाळा शिक्षक व आरोग्य विभाग यांचे कर्मचारी करून तातडीने गावातील सर्व वस्तीवर सर्दी, खोकला,ताप येणाऱ्या व्यक्ती व गुपचूप मुंबई इथून आलेल्या लोकांची माहिती देणार असून गावातील अनेक व्यक्ती हे ह्या कोरोना पॉझिटिव्ह च्या संपर्कात आल्याने सर्वाना शासकीय आश्रम शाळेत किंवा इतरत्र कॉरंटाईन केले जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश ढोकळे यांनी दिली.