मुंगी हा शब्द उच्चारला कि लगेच तिची प्रतिकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. एक छोटासा कीटक जो आपल्याला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत सुद्धा नाही आणि तिने जर आपल्याला काही त्रास दिला तर लगेच चिरडून टाकतो. पण खरं सांगायचं झालं तर मुंगीमध्ये सुद्धा कमालीची ताकद असते. तिनं मनात आणलं तर ती एखाद्या हत्तीला सुद्धा अद्दल घडवू शकते. अशाच एका मुंगीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहे.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच मुंगी किती शक्तिशाली असते.
काय आहे व्हिडिओमध्ये-
एक मुंगी चक्क आपल्या वजनाच्या ५० पट वजन ओढून नेताना दिसतेय. मुंगी हा अत्यंत रहस्यमय किटक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणाक नाही. कारण ती दिसते इवलीशी पण तिच्यामध्ये प्रचंड ताकद असते. सदर व्हिडीओ मध्ये २ मुंग्या चक्क एका जिवंत झुरळाला ओढून नेताना दिसतायेत. जणू एखाद्या माणसाने हातांनी हत्ती ओढावा तसं हे दृश्य दिसतेय. हा व्हिडीओ या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असून आतापर्यंत ३१ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला असून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. कारण इवलीशी मुंगी एवढं वजन कसं काय खेचू शकते हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. काही जणांनी तर या मुंगीची तुलना चक्क बाहुबलीशी सुद्धा केली आहे.
View this post on Instagram