प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -राज्यातील 476 धर्मादाय रुग्णालयांमध्ये मिळून 10 हजारांवर खाटा राखीव असून, यावर गरीब आणि निर्धन रुग्णांचा हक्क आहे. तो डावलल्यास संबंधित रुग्णालयांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. यात पुणे जिल्ह्यात 1 हजार 985 खाटा आहेत.
या सोयीमुळी मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार मिळणे सहज शक्य आहे. त्यासाठी केवळ दारिद्रय रेषेखाली असल्याचे पिवळे रेशनकार्ड किंवा तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी 20 टक्के खाटा राखीव असतात. त्यापैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत, तर 10 टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात असतात. राज्यात अशी एकूण 476 रुग्णालये आहेत. यामध्ये 10, 447 खाटा त्यांच्यासाठी राखीव आहेत. या विषयीची माहिती धर्मादाय आयुक्तालयाच्या हींििी: लहरीळीूं.ारहरीरीहीींर.र्सीें.ळप/ीा-ळप/ या वेबसाइटवर उपलब्ध असते. यावर प्रत्येक जिल्ह्यानुसार तिथल्या रुग्णालयांची यादी आणि उपलब्ध असणाऱ्या खाटांची संख्या पाहता येते. तसेच संबंधित जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांचे संपर्क दिलेले असतात. काही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांच्याशी संपर्क करता येऊ शकतो.
अशी मिळेल माहिती
वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर मुखपृष्ठाच्या उजव्या कोपऱ्यात साईट मॅपवर क्लिक करावे. त्यानंतरच्या पानावर धर्मादाय रुग्णालये येथे क्लिक करावे. त्यात महाराष्ट्राचा नकाशा येईल, त्यापैकी आपला जिल्हा क्लिक केल्यास रुग्णालयाची यादी दिसेल.
पुणे जिल्ह्यासाठी 1 हजार 985 खाटा
पुणे जिल्ह्यात 64 धर्मादाय रुग्णालये असून, निराधार आणि निर्धन रुग्णांसाठी 1 हजार 022 खाटा राखीव आहेत. गरीब आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी अल्प दरात 963 राखीव खाटा आहेत. अशा एकूण 1 हजार 985 खाटा उपलब्ध आहेत.
राज्यातील धर्मादाय रुग्णालये
476
निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी खाटा 10, 447
निर्धन रुग्णांसाठी मोफत खाटा 5354
50 टक्के सवलतीच्या दरात खाटा 5093
निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी निकष
निर्धन रुग्ण
उत्पन्न मर्यादा ः वार्षिक 85 हजार रुपये
पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचार
10 टक्के राखीव जागा
दुर्बल घटकातील रुग्ण
उत्पन्न मर्यादा ः वार्षिक 1 लाख 80 हजार रुपये
560 टक्के सवलतीच्या दरात वैद्यकीय उपचार
10 टक्के राखीव खाटा