चिंबळी -शेलपिंपळगाव (ता. खेड) प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या 19 गावांमध्ये आतापर्यंत 295 बाधित आढळले असून 183 जणांनी करोनावर मात केली आहे. 6 जणांचा मृत्यू झाला असून 106 जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखी यांनी दिली.
कार्यक्षेत्रातील सर्व रूग्ण महाळुंगे इंगळे येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी सुविधा केल्या आहे. 60 वयोगटावरील शुगर, रक्तदाब व गर्भवती महिलांवर लक्ष दिले जात आहे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेविका, शिक्षक गावात सर्वेक्षण करीत आहेत.