कराड – कृष्णा हॉस्पिटलमधून मंगळवारी 34 करोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे हॉस्पिटलने करोनामुक्तीचे सप्तशतक पार केले आहे. हॉस्पिटलमधून आजअखेर 704 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये कराड तालुक्यातील कार्वे नाका येथील 39 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरूष, शनिवार पेठेतील 42 वर्षीय पुरूष, 76 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, रेठरे बुद्रुक येथील 54 वर्षीय महिला, 24 वर्षीय युवती, 34 वर्षीय महिला, वडोली- निळेश्वर येथील 48 वर्षीय पुरूष, आगाशिवनगर येथील 41 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, धावरवाडी येथील 33 वर्षीय पुरूष, 27 वर्षीय महिला, कार्वे येथील 65 वर्षीय पुरूष, 38 वर्षीय पुरूष,
कोयना वसाहतीमधील 35 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी, 7 वर्षीय मुलगी, 37 वर्षीय पुरूष, वाठार येथील 35 वर्षीय पुरूष, येडेमच्छिंद्र येथील 31 वर्षीय पुरूष, नारायणवाडी येथील 35 वर्षीय पुरूष
शुक्रवार पेठेतील 70 वर्षीय पुरूष, 64 वर्षीय महिला, मलकापूर येथील 36 वर्षीय महिला, शेरे येथील 48 वर्षीय महिला, कालवडे येथील 21 वर्षीय युवक यांचा समावेश आहे. पाटण तालुक्यातील नेरळे येथील 59 वर्षीय पुरूष, पाटण येथील 20 वर्षीय युवती यांचा तर वाठार- किरोली येथील 30 वर्षीय पुरूष, भिलार येथील 68 वर्षीय पुरूष व नागठाणे येथील 18 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे. त्यांचे कृष्णा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वागत केले.