पिरंगुट -मुळशी तालुक्यात रविवारी (दि. 26) नव्याने 17 रुग्ण आढळून आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे. तर तालुक्यातील एकूण रुग्ण संख्येने 500चा टप्पा ओलांडला असून तो 509 झाला आहे.
तालुक्यात सुस 4, बाधन 4, नेरे 2, लवळे 2, जांबे 2, नांदे 1, भुकुम 1, उरवडे 1 असे एकूण 17 बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, आजपर्यंत 225 रुग्णांना घरी सोडले आहे. तर रविवारी 19 जणांना घरी सोडण्यात आले आहे.