स्वराज्य मंडळाची पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली कार्यकारिणी
शेवगाव (प्रतिनिधी) – शेवगाव तालुका स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी अरूण पठाडे यांची तर सरचिटणीसपदी देविदास फुंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिक्षक नेते बाजीराव मोढवे, भाऊसाहेब पाचरणे, स्वराज मंडळाचे जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे आदींनी ऑनलाइन सभेत मंडळाची भुमिका मांडत मार्गदर्शन केले.
यावेळी स्वराज्य मंडळाची निवडण्यात आलेली तालुका कार्यकारीणी पुढीलप्रमाणे कार्याध्यक्ष – विठ्ठल मार्कडे, कोषाध्यक्ष- मोहम्मद वसीम, कार्यालयीन चिटणीस- अमोल शेवाळे व उद्धव व्यवहारे, सहकार्याध्यक्ष संदीप बडे व प्रवीण शिंदे, सहसरचिटणीस – अशोक कोलगुडे व सतीश कासार, उपाध्यक्ष- रमेश थोरात, संजय तहकिक, ज्ञानदेव मोरे, गणेश वाघ, दीपक भुक्कन, प्रसिद्धी प्रमुख- किशोर तेलुरे, प्रल्हाद पवार, संजय गायकवाड व विजय शेळके, संपर्कप्रमुख-ज्ञानेश्वर काकडे, पप्पू क्षीरसागर, अरविंद खरमाटे, फ्रान्सिस मगर, संदीप थोरे, संघटक – अंबादास केदार, ऋषिकेश राऊत, महेश आहेर व साजेश मकासरे, जिल्हा प्रतिनिधी- अमोल जायभाये, किरण सुपेकर व गोविंद रुपनार.
उच्चाधिकार समिती तालुकाध्यक्ष -विजय म्हस्के, सरचिटणीस-विशाल घोडसे, कार्याध्यक्ष- मदन जाधव, कोषाध्यक्ष-सतीश पठाडे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा – गीतांजली काकडे, सरचिटणीस-मल्लेका इनामदार, कार्याध्यक्ष-शीतल झेंडे, कोषाध्यक्ष – कल्पना बटुळे. ऑनलान सभेत तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षक-शिक्षिका सहभागी झाल्या होत्या. यावेळी नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यकारिणीचे अभिनंदन होत आहे.