गाझियाबाद – स्मशानभूमीचे छत कोसळून झालेल्या अपघातात किमान 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील मुरादनगर भागात आज घडली. दिल्ली आणि राजधानीच्या परिसरात आज सकाळी हलका पाऊस पडत होता. त्यामुळे आडोसा म्हणून 25 जण स्मशानभूमीच्या छताखाली थांबले होते. त्यावेळी हे छत खाली उभ्या असलेल्या नागरिकांच्या अंगावर कोसळले.
17 people have died so far while 38 people have been rescued after a shed collapsed in Muradnagar. We've started a probe & we'll take strict action against those found guilty: Anita C Meshram, Divisional Commissioner, Meerut on Muradnagar roof collapse incident https://t.co/4geUbeviit pic.twitter.com/PgrXJ0ftY6
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 3, 2021
ही घटना घडली त्यावेळी स्मशानभूमीमध्ये राम धन नावाच्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात होते. छताखाली थांबलेले बहुतेक जण राम धन यांचेच नातेवाईक होते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून छताचा ढिगारा हटवून जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे काम लगेच सुरू केले गेले.
UP CM Yogi Adityanath takes cognizance of roof collapse incident in Muradnagar, Ghaziabad district.
"I've instructed district officials to conduct relief operations & submit a report of incident. All possible help will be provided to those affected by the incident," he said. pic.twitter.com/3Kt6ECqIz7
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 3, 2021
हे काम दुपारनंतरही सुरू होते. काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे गाझियाबाद ग्रामीण पोलीस अधिक्षक इराज राजा यांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मीरतचे विभागीय आयुक्त आनि मीरत विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे या घटनेबाबतचा अहवाल मागवला आहे.