नवी दिल्ली – कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या आपत्कालीन वापरास आज भारत सरकारने परवानगी दिली. मात्र भारत बायोटेकच्या कॅव्हॅक्सिन या लसीने तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या नसतानाच परवानगी दिल्याने काँग्रेस नेत्यांनी याबाबत भीती व्यक्त केली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील काल भाजपच्या लसीवर विश्वास नसून आपण करोना लस घेणार नसल्याचं म्हंटलं होत. त्यांच्या याच वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी निशाणा साधलाय.
यादव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “ही लोकं लपून-छपून करोना लस घेतील आणि लोकांना अंधारात ठेवतील. त्यांचं हे वक्तव्य राजकीय आहे. लस भारतीय आहे, वैज्ञानिक भारतीय आहेत ही आत्मनिर्भर भारताचे सर्वात चांगले उदाहरण आहे.”
ये लोग छुपकर वैक्सीन लगवा लेंगे और लोगों को भ्रम में रखेंगे। वे राजनीतिक दृष्टि से ऐसा बोल रहे हैं। वैक्सीन देश का है, वैज्ञानिक देश के हैं और आत्मनिर्भर भारत के लिए इससे अच्छा उदाहरण और कुछ नहीं हो सकता: केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, अखिलेश यादव के वैक्सीन नहीं लगवाने के बयान पर pic.twitter.com/3xMjj9UbUJ
— ANI_HindiNews (@AHindinews) January 3, 2021
काय म्हणाले होते अखिलेश यादव?
समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देशात लवकरच उपलब्ध होणाऱ्या करोनावरील लसींचा उल्लेख भाजपची लस म्हणून केला. ती लस मी घेणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या अखिलेश यांनी येथे पत्रकारांशी बोलताना भाजपच्या लसीवर विश्वास नसल्याचे म्हटले. जेव्हा आमचे सरकार येईल; तेव्हा सर्वांनाच मोफत लस पुरवू, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.